बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमधील एका पेट्रोल पंपावर एक धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या येळंबघाट या ठिकाणी मध्यरात्री पेट्रोलपंपावरील सुरक्षारक्षकाला मारहाण (thief beaten security guard) करून त्याची लूट करण्यात आली. पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने सुरक्षारक्षकाला जवळ बोलावून त्याला मारहाण (thief beaten security guard) केली. मध्यरात्री घडलेली हि घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. येळंबघाट येथील अरविंद जाधव यांच्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.
मध्यरात्री पेट्रोल पंपावरील सुरक्षारक्षकाला मारहाण करत केली लूट pic.twitter.com/gJqOPCf7p7
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 25, 2022
या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पेट्रोलपंपात मारहाण (thief beaten security guard) करून जबरी लूट करणाऱ्या दोघांना दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना एका हॉटेलात पार्टी करताना नेकनूर पोलिसांनी अटक केली आहे. अजय ढोले आणि शुभम कवडे अशी या आरोपींची नावे आहेत.
पेट्रोल पंपावरील वॉचमन भिकाजी इंगोले हे ड्युटीवर असताना अनोळखी दोघे दुचाकीवरून आले. त्यांनी पेट्रोल मागितले असता इंगोले यांनी कर्मचारी झोपले आहेत, असे सांगितले. त्यावर दोघांनी त्यांना मोबाइल मागितला. इंगोले यांनी मोबाईल देण्यास नकार दिला तेव्हा पंपावरील कर्मचारी आणि पैसे कुठे आहेत अशी विचारणा केली. यानंतर आरोपींनी इंगोले यांना मारहाण (thief beaten security guard) करण्यास सुरुवात केली. हा सगळा गोंधळ ऐकून पेट्रोल पंपावरील इतर कर्मचारी जागे झाले. यानंतर या चोरटयांनी घटनास्थळावरून पळ काढला.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर