पनवेल : हॅलो महाराष्ट्र – पनवेलमधील कामोठे सेक्टर 10मध्ये चोरीची घटना घडली आहे. यामध्ये कामोठे सेक्टर 10 मधील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा (robbery) टाकण्यात आला. या दरोड्यात (robbery) दुकानातून जवळपास 6 लाखांचे चांदीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या दरोड्याप्रकरणी (robbery) कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा! 6 लाखांचे दागिने केले लंपास pic.twitter.com/tjlDzHcaMj
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 19, 2022
काय आहे संपूर्ण प्रकरण
मागील काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दुकानाला लागून असलेला गाळा दोन लोकांनी भाड्याने घेतला. त्यानंतर त्यांनी दोन गाळ्यांच्या मध्ये असलेल्या भिंतीला फोडण्यास सुरुवात केली. रात्री भिंतीला मोठा बोगदा पाडला आणि ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश करून जवळपास 6 लाखांचे चांदीचे दागिने लंपास केले. सोन्याच्या दागिन्यांचे कपाट फोडता न आल्याने सुदैवाने ते वाचले. मात्र, काही वस्तू आणि चांदी चोरून नेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानाचा मालक जेव्हा दुकान खोलायला आला तेव्हा हि संपूर्ण घटना (robbery) उघडकीस आली. यानंतर दुकान मालकाने याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर या घटनेची माहिती मिळताच गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त सुरेश मेंगडे आणि उपायुक्त शिवराज पाटील तसेच कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय