एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच रोहिणी खडसेंचं ट्विट चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भाजप मध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दिल्लीत एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आता ८ किंवा ९ एप्रिलला खडसे भाजप प्रवेश करतील असं बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या सगळ्यात नाथाभाऊंची लेक रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्याच दरम्यान रोहिणी खडसे यांनी एक ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय आहे रोहिणी खडसे यांचे ट्विट –

मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …लढ़ेंगे और जीतेंगे असं ट्विट करत रोहिणी खडसे यांनी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार आहोत हे स्पष्ट केलं आहे.

खडसेंचा भाजप प्रवेश कधी??

एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा मागील अनेक दिवसापासून सुरूच होत्या. मात्र नुकतीच त्यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याने खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे असं बोललं जात आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची तारीखच सांगून टाकली आहे. येत्या 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जाईल.