हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. एकूण 13 राज्यांमधून केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. यानंतर संमिश्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी रोहित पवारांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
रोहित पवार म्हणाले, “प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे मविआ सरकारचं यश आहे असे रोहित पवार म्हणाले.
उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 15, 2021
उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये! असा टोला रोहित पवारांनी लगावला.