ठाकरे सरकारवर ताशेरे ओढणार्‍या योगी आदित्यनाथांना रोहित पवारांचे सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच ट्विटर वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथापि महाराष्ट्राच्या आघाडी सरकारला दूषणे दिली आहेत. योगी यांनी महाराष्ट्र सरकारवर कामगारांचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांना काम न देऊन सर्व काही सोडून जाण्यास भाग पाडले असे त्यांनी म्हंटले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटला सणसणीत प्रत्युत्तर देत महाराष्ट्र सरकारने उत्तरप्रदेश मधील कामगारांना कशाप्रकारे सहकार्य केले आहे हे सांगितले आहे.

‘महाराष्ट्रासाठी आपला घाम गाळलेल्या कामगारांसोबत शिवसेना-काँग्रेस सरकारने केवळ छळ केला आहे. संचारबंदीत त्यांच्यासोबत विश्वासघात केला आणि त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देऊन घरी जाण्यास भाग पाडले. या अमानवीय व्यवहारासाठी मानवता उद्धव ठाकरे यांना कधीच माफ करणार नाही’ असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटला उत्तर देत आघाडी सरकारने सीएम फंडातील पैसे खर्च करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवल्याचे रोहित पवार यांनी ट्विट द्वारे सांगतिले आहे. तसेच आता त्यांच्या योग्य वैद्यकीय तपासण्या करून त्यांना नोकरी देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले आहे.

सोबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी केलेले आरोप खोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. या व्हिडिओमध्ये एक कामगार महाराष्ट्रातील लोकांनी आम्हांला अन्नपाणी दिले काळजी घेतली मात्र उत्तरप्रदेशमध्ये अन्नपाणी काहीच मिळत नसून गावेच्या गावे रिकामी करून लोक निघून जात असल्याचे सांगत आहे. या ट्विटद्वारे आता उत्तरप्रदेश सरकारने या घरी आलेल्या श्रमिकांची काळजी घेतली पाहिजे. असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.