फळबाग शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी रोहित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | कोरोना व्हायरसमुळे देशभर सध्या लाॅकडाउन आहे. सर्व छोटे मोठे उद्योग बंद असल्याने कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होताना दिसत आहे. उद्याग व्यवसायांसोबतच शेतकर्‍यांवरही याचा परिणाम पडला आहे. अनेक फळबाग शेतकर्‍यांचा शेतीमाल दळणवळना अभावी शेतातच पडून आहे. तेव्हा अशा फळबाग शेतकर्‍यांना वाचवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे.

छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या कर्जाच्या हप्त्यास मुदतवाढ देऊन रिझर्व्ह बँकेने त्यांना मोठा दिलासा दिला. अशाच प्रकारे द्राक्ष, संत्रा, केळी, आंबा या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनाही मदतीची गरज आहे. तसंच कोणालाही पेनल्टी लावू नये, अशी विनंती पवार यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना केली आहे. एक ट्विट करुन पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

तसेच, आवश्यक ती दक्षता घेऊन शहरात छोट्या रिक्षा-टेम्पो चालकांना वाहतुकीची परवानगी दिल्यास किरकोळ किराणा दुकानदारांना धान्य मिळेल. परिणामी धान्याचा तुटवडा भासणार नाही आणि भावही वाढणार नाहीत असंही पवार यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता