Wednesday, February 1, 2023

शरद पवार यांच्या तब्बेतीबाबत रोहित पवारांचे ट्विट; म्हणाले…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काही दिवसांपासून आरोग्याचे कारणानेन दवाखान्यात होते. मागील दोन महिण्यांत पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. शरद पवारांच्या तब्बेतीबाबत आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली आहे. त्यांची तब्येत उत्तम असल्याचे रोहित यांनी सांगितले आहे.

मंगळवारी रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ‘ऑपरेशननंतर हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्याने घरी आलेल्या आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. त्यांची तब्येत उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस ते विश्रांती घेत आहेत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमे आणि पदाधिकाऱ्यांकडून राज्याचा नियमित आढावाही घेत आहेत! अशी माहिती रोहित यांनी दिली आहे.

- Advertisement -

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे आढळून आल्याने त्यांच्यावर ३० मार्च रोजी मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर बारा एप्रिल रोजी पित्ताशयावरील दुसरी शस्त्रक्रिया झाली होती. या दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर तपासणीसाठी रुग्णालयात गेल्यानंतर पवार यांच्या तोंडात अल्सर आढळून आला होता. तो काढण्यासाठी पवार २१ एप्रिल रोजी पुन्हा ब्रीच कॅंडीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर १ मे रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

रुग्णालयात असतानाही शरद पवार हे सातत्याने राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा तुटवडा असो किंवा लसीकरणातली अडचणीची परिस्थिती असो वा ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधात निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती. रुग्णालयात असतानाही शरद पवार हे रोज परिस्थितीचं अवलोकन करत होते. नव्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्याच्या तिजोरीवर पडलेला ताण पवार यांच्या ध्यानात आला आणि त्यांनी रुग्णालयातून घरी परतल्यावर पक्ष सहकाऱ्यांना तातडीने मदत निधीसंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.