हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करताना त्यांनी चाहत्याची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्याने त्यांना एकांतवासात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचंही या चाहत्याने सांगितलं. मात्र बायो-बबलचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुबमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
मेलबर्नमध्ये एका हॉटेलात या पाच खेळाडूंनी जेवण केलं. एका चाहत्याने त्यांचे बिल भरलं. चाहत्याने खेळाडूंकडून पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर या खेळाडूंनी त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि त्या जोडीला धन्यवाद दिले. घडलेला प्रकार आणि व्हिडीओ त्या चाहत्याने ट्विट केला. या सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचंही या चाहत्याने सांगितलं. मात्र बायो-बबलचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुबमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ जिथे वास्तव्यास आहे, तेथून या पाच जणांना वेगळ्या ठिकाणी विलग करण्यात आले आहे. करोना संदर्भातील नियमावली लक्षात घेता इतर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून या पाच खेळाडूंना सामन्यासाठी सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे
भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघातील सर्व सदस्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक नियम केलेल आहेत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच असेही सांगण्यात आले आहे की ‘बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. तसेच याचाही शोध घेत आहेत की जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला आहे की नाही.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’