पोलार्डच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची इमोशनल पोस्ट; म्हणाला की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सने आपला स्टार खेळाडू कायरन पोलार्डला रिलीज केल्यांनतर पोलार्डने आयपीएल मधून निवृत्त्ती घेतली. मुंबई इंडियन्स विरोधात खेळण्याचा विचारही कधी करू शकत नाही अशा भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. पोलार्डने लांबलचक पोस्ट शेअर करत अनेक आठवणींना उजाळा दिला होता. त्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही भावुक झाला. रोहितने सुद्धा एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

रोहित शर्मानं आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर पोलार्डसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटो खाली मोठा माणूस, मोठा प्रभाव आणि नेहमीच मनापासून खेळणारा. मुंबई इंडियन्सचा खरा लीजेंड्स”, असं लिहीत रोहितने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. रोहित शर्माची ही इमोशनल पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/Ck-2yRbobSY/?igshid=YmMyMTA2M2Y=

दरम्यान, पोलार्डनं 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तब्बल १३ वर्ष तो मुंबई इंडियन्स कडून खेळला. पोलार्डने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 189 सामने खेळले. यादरम्यान त्याने 3 हजार 412 धावा केल्या आहेत. मुंबईचा मुख्य खेळाडू म्हंणून तो ओळखला जात होता. पोलार्डने काल आयपीएल मधून निवृत्ती जाहीर करताना मुंबई सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. जर मी या फ्रँचायझीसाठी खेळू शकलो नाही तर मला त्यांच्याविरुद्धही खेळायचे नाही असं त्याने म्हंटल. निवृत्तीनंतर पोलार्ड आता मुंबई इंडियन्सचा नवा फलंदाजी प्रशिक्षक असेल.