IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरला यंदा तरी पदार्पणाची संधी मिळणार का? रोहित शर्मा म्हणतो..

arjun tendulkar rohit sharma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 31 मार्चला म्हणजे उद्यापासून IPL 2023 ला सुरुवात होत आहे. सर्वच संघाकडून आयपीएल जिंकण्यासाठी मेहनत घेतली जात आहे, तसेच व्युव्हरचना ठरवली जात आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून पदार्पण करू शकतो. कर्णधार रोहित शर्माने याबाबत सूचक विधान केलं आहे.

अर्जुन तेंडुलकर हा गेल्या 2 वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे, मात्र अजून एकदाही त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएल मध्ये तरी अर्जुनला संधी मिळणार का? असा सवाल केला असता रोहित म्हणाला, अर्जुनने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. आगामी मोसमासाठी तो तयार असेल तर निश्चितच त्याच्या निवडीसाठी विचार केला जाईल. रोहितच्या या उत्तराने अर्जुन तेंडुलकरला अंतिम 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, मुंबईचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनीही अर्जुनचे कौतुक केलं आहे. अर्जुन नुकताच दुखापतीतून बाहेर आला आहे. गेल्या 6 महिन्यांत तो खूप चांगले क्रिकेट खेळत आहे, विशेषत: गोलंदाजीच्या बाबतीत त्याची कामगिरी चांगली आहे. त्यामुळे मला वाटते की होय, जर आपण त्याची निवड करू शकलो तर ते आपल्यासाठी खूप चांगले असेल असं बाउचर यांनी म्हंटल आहे.