रोहित शर्मा सलामीला नकोच; माजी क्रिकेटपटूने दिला वेगळाच सल्ला

Rohit Sharma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंड विरुद्ध हैद्राबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG Test) भारतीय संघाला अनपेक्षित पराभवाला समोर जावे लागले. पहिल्या डावात आघाडी मिळून सुद्धा ऑली पोपचे शानदार शतक आणि फिरकीपटू टॉम हार्टलीच्या गोलंदाजीपुढे भारताची फलंदाजी ढेपाळली आणि 28 धावांनी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सर्वच स्तरातून भारताच्या फलंदाजीवर टीका करण्यात आली. खास करून दोन्ही डावात अपयशी ठरलेल्या शुभमन गिलवर टीकाकारांनी लक्ष्य केलं. मात्र माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) एक वेगळाच सल्ला दिला आहे.

वसीम जाफरने भारताच्या फलंदाजी क्रमात काही बदल करायला सांगितलं आहेत. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये ते म्हणतात माझ्या मते शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीला उतरायला हवं आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर यायला हवे. गिलने तिसऱ्या क्रमांकावर खेळणं योग्य नाही. त्यामुळे त्याने सलामीला यायला हवं. रोहित शर्मा फिरकी गोलंदाजांना चांगल्या पद्धतीने खेळू शकतो त्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोणतीही अडचण येणार नाही असं मत वसीम जाफरने व्यक्त केलं.

दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड मधील एकूण ५ कसोटी सामन्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी २ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे हा सामना खेळवण्यात येईल. हे मैदान सुद्धा फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत ज्याप्रमाणे इंग्लडच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले होते ते पाहता टीम इंडियाला फलंदाजीत आणखी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. तसेच कसोटी मालिकेत आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्वाचं आहे.