सांगली प्रतिनिधी | कोरोना विषाणुने राज्यांत थैमान घातले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाॅकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवले आहे. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वयैक्तिक फोन करुन चौकशी केली. मात्र यावेळी काही कार्यकर्ते राहून गेले. इस्लामपूरातील असाच एक कार्यकर्ता रोहितदादांचा फोन आला नाही म्हणुन रुसून बसला. मग रोहित यांनी थेट ट्विट करुन फोन आला नाही म्हणुन काळजी घ्यायला विसरु नको असे सांगितले.
आमंत्रण देताना घरची माणसं राहतात पण लगेच रुसायचं नसतं. नवेकोरे कपडे घालून पहिल्या पंगतीत जेवायचं असतं. तसंच इथपण आहे भावा,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 11, 2020
फोन आला नाही तर काळजी घ्यायला विसरु नको. बाकी गडबडीत घरचीच माणसं राहून जातात हे तू समजून घेवू शकतोस. pic.twitter.com/ZsfFchaiwP
रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमादार आहेत. शरद पवार यांचे नातू असलेल्या रोहित यांची तरुण वर्गात चांगलीच क्रेझ आहे. रोहितसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने जोडून ठेवण्यात निश्णांत आहेत. लाॅकडाउनमुळे सध्या घरात असलेल्या रोहित यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वयैक्तिक फोन करुन अनेकांची विचारपूस केली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काळजी घ्यायला सांगितली. मात्र यात काही कार्यकर्ते राहून गेले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचा उदय माळी नावाचा कार्यकर्ता रोहितदादांचा फोन आला नाही म्हणुन रुसून बसला. त्याने फेसबुक पोस्ट शेयर करुन आपले दुख:ही व्यक्त केले.
रुसलेल्या कार्यकर्त्याचा फुगवा काढण्यासाठी मग रोहित पवारांनी थेट एक ट्विट करुन सदर कार्यकर्त्याला फोन आला नाही म्हणुन काळजी घ्यायला विसरु नको असे सांगितले. ‘आमंत्रण देताना घरची माणसं राहतात पण लगेच रुसायचं नसतं. नवेकोरे कपडे घालून पहिल्या पंगतीत जेवायचं असतं. तसंच इथपण आहे भावा असं म्हणत पवार यांनी त्याचा रुसवा काढण्याचा प्रयत्न केला. गडबडीत घरचीच माणसं राहून जातात हे तू समजून घेवू शकतोस असं म्हणत रोहित यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. राहित यांच्या या ट्विटमुळे आता अनेक असे रुसलेले कार्यकर्ते खूष झाले असतील यात वाद नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
या बातम्याही वाचा –
लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ, टीका करणे हा एकमेव धंदा शिल्लक – अमोल मिटकरी@amolmitkari22 @RohitPawarSpeak @RRPSpeaks @RohitPawarOffic @NCPspeaks #HelloMaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 11, 2020
https://t.co/bpD4B2CPGi
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
वाधवान कुंटुंबाच्या पाचगणी प्रवासाबाबत रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..@RRPSpeaks @RohitPawarSpeak @RohitPawarOffic #HelloMaharashtra #Mahabaleshwar https://t.co/o7BGs5fmsa
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020