Video: मास्क नाही आहे, टेन्शन नहीं लेने का! रोनित रॉयने शोधली मास्क बनवण्याची भन्नाट आयडिया

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. अशा वेळी काळजी घेण्याची विशेष गरज आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार हात धुण्याची,बाहेर जातांना तोंडाला मास्क लावण्याचं आवाहन करत आहे. मात्र सध्या बाजारात मास्कचा तुटवडा जाणवत असून काही मास्क हे प्रचंड महाग आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला ते परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळेच अभिनेता रोनित रॉयने घरच्या घरी कमी खर्चात मास्क करण्याची भन्नाट आयडिया सांगितली आहे. त्याने चक्क टी-शर्टपासून मास्क तयार केला आहे. ‘मास्क नाहीये? काळजी करु नका. हे तयार करणं फार सोप्पं आहे’, अशी कॅप्शन रोनितने या व्हिडीओला दिली आहे. रोनित रॉय छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असून त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चला तर पाहूया हा व्हिडिओ..

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here