Rooftop Solar Yojana : सरकारने वाढवली ‘या’ योजनेची मुदत; तुम्हीसुद्धा घरावर बसवून घ्या सोलर पॅनल

Rooftop Solar Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Rooftop Solar Yojana : केंद्र सरकार कडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. आता आपले वीज बिल कमी करण्यासाठी देखील केंद्र सरकार आपल्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. या योजनेचे नाव रुफटॉप योजना असे आहे. जर आपण अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण सरकारने ‘रूफटॉप सोलर प्रोग्रॅम’चा कालावधी 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्ग्रत आता ग्राहकांना आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. या योजनेमुळे आपले वीज बिलही कमी होण्यास मदत होईल. यासोबतच मोठी सबसिडीदेखील मिळेल. मात्र यासाठी सरकारी पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

Solar Rooftop Yojana Know All Details About This Scheme - Solar Rooftop Yojana: सरकारी सब्सिडी पर लगवाएं अपने घर की छत पर सोलर पैनल, जानिए कैसे करना है आवेदन - Amar Ujala

ऊर्जा मंत्रालयाने याबाबत एक निवेदन देताना सांगितले की,” रुफटॉप सोलर प्रोग्रॅमला मार्च 2026 पर्यंत विस्तारित केल्यामुळे त्यामध्ये मिळणारे अनुदान लक्ष्य पूर्ण होईपर्यंत उपलब्ध राहील.” मंत्रालयाने पुढे म्हटले की,” आता सर्व निवासी ग्राहकांनी राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करून कोणत्याही कंपनीला कोणतीही अतिरिक्त रक्कम देऊ नये किंवा मीटर आणि चाचणीसाठी संबंधित वितरण कंपनीने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देऊ नये.” Rooftop Solar Yojana

Anand Rooftop Solar Power Plant : Amazon.in: Garden & Outdoors

अशा प्रकारे करा ईमेलद्वारे तक्रार

आता ग्राहकांना कोणताही विक्रेता, एजन्सी किंवा व्यक्तीकडून अतिरिक्त शुल्काची मागणी झाल्यास ईमेलद्वारे तक्रार करता येईल. तसेच ज्या ग्राहकांना आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवायचे आहेत त्यांना नॅशनल पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. हे लक्षात घ्या कि, या योजनेअंतर्गत संपूर्ण देशासाठी तीन किलोवॅट क्षमतेसाठी 14,588 रुपये प्रति किलोवॅट सबसिडी दिली जाते आहे. Rooftop Solar Yojana

Amazon launches first rooftop solar power plant in UAE - REGlobal - Big Moves

मिळणार 43,000 रुपयांपेक्षा जास्त अनुदान

केंद्र सरकार कडून तीन किलोवॅटच्या सोलर पॅनेलवर 43,000 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळत ​​आहे. अशा परिस्थितीत लोकांना छतावर सोलर पॅनेल बसवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या तीन किलोवॅटच्या सोलर पॅनलद्वारे आपल्या घरातील एसी, फ्रीज, कुलर, टीव्ही, मोटार, पंखा साठीचे बिल दर महिन्याला शून्यावर येईल. तसेच याद्वारे मिळालेली अतिरिक्त वीज भाडेकरू किंवा शेजाऱ्यांना विकून पैसे देखील कमवता येतील. Rooftop Solar Yojana

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://solarrooftop.gov.in/

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा