सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जावली तालुका हा दुर्गम तालुका असून खरीप पिक हंगाम सुरू झाला आहे. त्यामध्ये दुकानदार कृषी सेवा केंद्राच्या गोंडस नावाखाली खताचे बी- बियाण्यांचे दर मनमानी पद्धतीने अवाजवी दर लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. खतांचा साठा करून ठेवणाऱ्या कृषी दुकानदारांवर कारवाई करा, अशी मागणी आरपीआयचे जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी जावलीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे केली.
आरपीआयच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन आज कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जावली तालुक्यात अनेक खतांची दुकाने आहेत. अनेक प्रकारची खते, विविध बी-बियाने, कीटकनाशके यांचे डेथ स्टॉक रजिस्टरच्या व त्याच्या बोगस खतांच्या दर्जाहिन खतांची अद्यापही चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची प्रहसनाच्या वतीने चौकशी करण्यात यावी.
कृषी केंद्र दुकानांच्या मध्ये राबवल्या गेलेल्या त्या योजनेमधून किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला? किती प्रमाणात त्यांना संबधित योजनेचा फायदा झाला? त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची फेर चौकशी करून संपूर्ण शासकीय योजनेची सखोल चौकशी करणे गरजेची आहे, असेही बगाडे यांनी निवेदनात म्हटले आहे.