सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरात सध्या अनेक कॉफी शॉप व कॅफे आहेत. या ठिकाणी महाविद्यालयीन मुले-मुली जातात. मात्र, या कॅफेतील काही कॅफेंमध्ये कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू असल्याचा संशय आल्याने आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कॅफेंवर धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी कॅफेमध्ये शिरून त्याची तोडफोड केली. अनेकदा निवेदन देऊनही पोलीस प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा पकारचे पाऊल उचलल्याचा आरोप आरपीआय कार्यकर्त्यांनी केला आहे.
सातारा शहराच्या जवळ पुणे-बेंगलोर हायवे नजिक हिडन नावाचा कॅफे आहे. या ठिकाणी आज दुपारी आरपीआयच्या महिला आघाडी आठवले गटाच्या महिला अध्यक्ष पूजा बनसोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली. यावेळी कॅफेवर दगडफेक केली. यामध्ये कॅफेच्या काचा फुटल्या. तर इतर साहित्याची मोडतोड झाली.
अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कार्यकर्त्यांनी कॅफेचे नुकसान केल्यानंतर परिसरातील नागरिक संबंधित प्रकार पाहण्यासाठी गोळा झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसही घटना स्थळी दाखल झाले असून या घटनेची माहिती त्यांनी घेतली आहे.
अश्लील चाळे सुरु असणाऱ्या कॅफेवर RPI च्या कार्यकर्त्यांनी टाकली धाड अन् पुढे घडलं असं काही… pic.twitter.com/X1kfiCiURR
— santosh gurav (@santosh29590931) April 21, 2023
संबंधित आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सातारा शहरात अशा प्रकारे अश्लीष चाळे करण्यासाठी अशी ठिकाणी उभारली जात आहेत. असे प्रकार वेळीच रोखले पाहिजेत. अशा प्रकारामुळे अल्पवयीन मुलीही बळी फडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अशा घटना कमी करण्याची जबाबदारी हि प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. जर अशा कॅफेच्या माध्यमातून एखाद्या मुलीवर अत्याचार झाला तर याची जबाबदारी प्रशासन घेईल का? असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.