RRR Movie Review: ‘रौद्रम रणम रुधिरम’ .. जबरदस्त.. खतरनाक… एकदा पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची प्रतिक्षा होती, तो चित्रपट ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच ‘RRR‘ 25 मार्च 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सध्या या चित्रपटाचे तेलुगू व्हर्जन समोर आले आहे त्या रिव्ह्यूनुसार, ‘RRR’ चित्रपटाने तेलुगू प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

कथेबद्दल सांगायचे तर, भारताचा तो काळ, जेव्हा भारत पराधीनतेच्या बेड्यांमध्ये जखडला होता, तेव्हा स्वातंत्र्यलढा वेगवेगळ्या पातळ्यांवर लढला जात होता. राजामौली यांनी त्या काळातील पानांवर एका काल्पनिक स्वातंत्र्याची कथा तयार केली आहे. या कथेचे दोन नायक आहेत ज्यांना दिग्दर्शकाने आग आणि पाणी म्हणून दाखवले आहे. आग म्हणजे राम (राम चरण) जो एक धोकादायक पोलिस आहे आणि तो फक्त ब्रिटीश सैन्यात काम करतो. हा असा पोलिस कर्मचारी आहे जो आपल्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हजारोंच्या गर्दीत एकटाच प्रवेश करतो. दुसरा पाणी आहे – भीम (ज्युनियर एनटीआर) जो सरळ, शांत आणि स्वतःच्या जगात आनंदी आहे. भीम गोंड जातीचा आहे, जे लोक अतिशय शांतीप्रिय आहेत आणि कळपात राहतात. या दोघांच्या आपल्या आपल्या संघर्षाची कथा आहे .

कथेत सांगण्यासारखं बरंच काही आहे, या चित्रपटाच्या हाय पॉईंट्स बद्दल बोलायचे तर, त्याची अ‍ॅक्शन जबरदस्त आहे. राज चरणच्या प्रस्तावनेचा सीन, , जेव्हा तुम्ही पडद्यावर पहाल तेव्हा तुमचे मन पुन्हा पुन्हा म्हणेल की हे होऊ शकत नाही, हे अशक्य आहे… पण हा सीन म्हणजेच दिग्दर्शकाची कला आहे

अभिनयाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट फक्त राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा आहे… प्रमोशनमध्ये दिसलेल्या आलिया भट्टची तुम्ही खूप वाट पाहत असाल तर तुमची फसवणूक होईल. राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने हिंदी चित्रपटांमध्येही त्यांचा आवाज वापरला आहे आणि त्यांचा आवाजही त्यांना अगदी सूट होत आहे. तुम्ही साऊथचे चित्रपट हिंदीत डब करताना पाहत आहात,असे तुम्हाला वाटणारच नाही. दोन्ही कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्कृष्ट केल्या आहेत. दुसरीकडे अजय देवगणबद्दल बोलायचे झाले तर त्याची भूमिका छोटी असली तरी काही मिनिटांच्या सीनमध्येही अजय आपला प्रभाव सोडताना दिसत आहे.

दिग्दर्शक राजामौली यांचा आरआरआर पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, केवळ दक्षिणेतील सुपरहिट चित्रपटांची कथा कॉपी करून बॉलीवूडची विभागणी करता येणार नाही. पडद्यावर काल्पनिक कथेवर आधारित जग निर्माण करण्याचे कौशल्य राजामौली यांच्याकडे आहे आणि त्यांचे कौशल्य लक्षात घेऊन या चित्रपटाला कोणी किती रेटिंग दिले ते पहा

IMDB रेटिंग – 9.1/10
TOI रेटिंग – 3.5/5
taran adarsh -4/5

Leave a Comment