आणखी एक पक्ष महायुतीकडून महाविकास आघाडीच्या वाटेवर? जानकारांनी घेतली पवारांची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला दारूण पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश यामुळे भाजपच्या नेतृत्वातील महायुतीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे महायुतीत अडगळीत पडलेल्या मित्र पक्षांनी नवी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आलं आहे. ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचं जानकर सांगत असले तरी जानकर हे लवकरच महाविकास आघाडीत सामिल होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. (rsp leader mahadev jankar met sharad pawar)

महादेव जानकर यांनी 3 तारखेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबतं झाल्याचं सांगण्यात येतं. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचं जाहीर केलं आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे. तसेच पवारांची भेट घेण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना या भेटीची कल्पना दिली होती, असा दावाही जानकर यांनी केला आहे.

जानकरांची जुळवाजुळव?
नुकत्याच झालेल्या विधानपरिषदांच्या निवडणुका, त्यात भाजपला आलेलं अपयश आणि तीन पक्षांच्या आघाडीला मिळालेलं यश.आगामी काळातही या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे जानकर हे नव्याने राजकीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. जानकरांच्या पक्षाचा एकच आमदार असला तरी ते मात्र, स्वत: सत्तेच्या पदापासून दूर आहेत. तसेच त्यांच्या पक्षाचं कामही थंडावलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी जानकरांकडून जुळवाजुळव करण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.(rsp leader mahadev jankar met sharad pawar)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment