सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat Tests Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्यानं त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांना रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, मागील चोवीस तासात देशात 1 लाख 30 हजार हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची (Corona Cases in India) नोंद झाली आहे. यातही महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्यानं होतं असल्याचं चित्र आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group