आमिर खान हा तर भारतविरोधी चीनचा लाडका; पांचजन्यमधून RSS ची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या पांचजन्यमधून अभिनेता आमिर खानवर जहरी टीका करण्यात आली आहे. तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच चिनी कंपन्यांची जाहिराती आमिर करत असल्याचे या लेखमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ‘ड्रॅगन का प्यार खान’ या मथळ्याखाली छापून आलेल्या लेखामधून आमिरच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.

स्वातंत्र्याच्या आधी आणि त्यानंतरही देशभक्ती या विषयावर चित्रपट निर्माण झाले. मात्र, नंतर चित्रपटांना पाश्चिमात्य संस्कृतीची हवा लागली आणि नेतृत्व करणारा चित्रपट संपला. मागील पाच ते सहा वर्षांमध्ये पुन्हा एकदा देशभक्तीवर आधारित चित्रपटांची संख्या वाढलेली दिसते. मात्र, दुसरीकडे असे काही अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत ज्यांना आपल्या देशाबरोबर वैर असणारे चीन आणि तुर्कीसारखे देश जास्त आवडतात, अशा शब्दांमध्ये आमिरवर निशाणा साधण्यात आला आहे.

मुस्लिमांच्या उम्मांचा (माता) दूत बनण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तुर्कीच्या राष्ट्रापतींची पत्नी आणि आमिर खान यांची नुकतीच भेट झाली आणि या भेटीचे फोटो समोर आले आहेत, असा उल्लेख लेखामध्ये करण्यात आला आहे. चीनमध्ये एकीकडे इतर कलाकार आणि निर्माते अपयशी ठरत असतानाच आमिर खानचे चित्रपट भरपूर कमाई करताना दिसतात. आमिर खान चिनी व्हिवो मोबाइल कंपनीचा ब्रॅण्ड अँबेसिडर आहे. ही कंपनी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आलं आहे, असं लेखात म्हटलं आहे.

भारतामध्ये एखाद्या अभिनेत्याला लोकं डोक्यावर घेऊन नाचतात आणि यशाच्या शिखरावर पोहचवतात तेव्हा त्याचा धर्म पाहिला जात नाही. त्याच्या चित्रपटांवर लोकं खूप पैसे उधळतात. लोक त्याच्या धर्माची नाही तर त्याच्यातील कलाकाराचे कौतुक करतात, असंही या लेखामध्ये म्हटलं आहे. मात्र जेव्हा अशी व्यक्ती देशातील लोकांना ठेंगा दाखवून त्यांच्या प्रेमाच्या मोबदल्यात ‘आधी धर्म नंतर देश’सारखी जिहादी विचारसरणी दाखवू लागते किंवा थोड्या पैशांसाठी शत्रू देशाच्या इशाऱ्यावर नाचू लागते तेव्हा चीड येते. अशी व्यक्ती शत्रू राष्ट्रातील पाहुणचार निर्ल्जमपणे कबुल करु लागली तर देशातील लोकांनी त्यांची फसवणूक झाली आहे असं समजावं का?, आजकाल चीन आणि तुर्कीचा लाडका ठरत असलेल्या आमिर खानच्या याच सर्व गोष्टींचा त्याच्या चाहत्यांना आणि सामान्य देशभक्तांना राग येत आहे, असंही लेखात म्हटलं आहे.

आमिर खानचा दंगल चित्रपट चीनमध्ये भरपूर कमाई करताना दिसतो तर त्याच विषयावर असणारा सलमान खानचा सुल्तान मात्र फ्लॉप ठरला. असं का झालं असावं?, असा प्रश्न या लेखामध्ये विचारण्यात आला आहे. आमिर खान स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानत असेल त्याने जम्मू-काश्मीरच्या विषयावर पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तुर्कीमध्ये चित्रिकरण करण्याचा विचार का केला. लोकं अजूनही आमिरची ती मुलाखत विसरलेले नाहीत ज्यामध्ये त्याने, “माझी पत्नी किरण रावला भारतामध्ये भीती वाटते आणि भारतात असहिष्णुता वाढत आहे,” असं वक्तव्य केलं होतं. ज्या देशातील सरकार सत्तेत असताना सर्वाधिक पत्रकारांना अटक करण्यात आली आहे, ज्या देशामध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन ही सामान्य गोष्ट मानली जाते आणि सोशल नेटवर्किंगवर कधीही बंदी घातली जाते अशा अदेशाच्या इशाऱ्यावर आमिर खान चालत आहे, अशी टीका या लेखामध्ये करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment