ओमिक्रॉनचा धसका!! मुंबईत जमावबंदी लागू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओमायक्रॉनचे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मुंबईत काल 3 रुग्ण सापडल्या नंतर राज्यातील रुग्णसंख्या 17 वर पोचली आहे. मुंबईतील एक रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 11 आणि 12 डिसेंबरला कलम 144 लागू करण्यात आले आहे. या दरम्यान लोकांच्या रॅली, मोर्चे, मिरवणुका आणि वाहनांना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 17 जणांना ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झाली आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत CRPC कलम 144 लागू केले. यामुळे पुढील दोन दिवस मोर्चे आणि निदर्शने करण्यास बंदी असेल.

Leave a Comment