हो म्हणूनच ठरलंय ! महाविकास आघाडीत स्थिरावणार; रूपाली पाटील यांचे पक्षप्रवेशाबाबत महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा काल रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याबाबत अजून विचार केला नसल्याचे सांगितले. मात्र, आता महाविकास आघाडीत आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावणार आहेत. त्यांनी स्वतःच एक सूचक ट्वीट करून ही माहिती दिली आहे. “आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

रूपाली पाटील-ठोंबरे आज नुकतेच ट्विट करीत महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार आहे,” असे ट्विट पाटील यांनी केले आहे.

काल झालेल्या पत्रकार परिषदेत रुपाली पाटील यांनी मनसे पक्ष सोडण्यामागची खडखड बोलून दाखवली. यावेळी रुपाली पाटील म्हणाल्या, मनसेत निःस्वार्थी, प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. मी या परिवारात बहीण म्हणून नेहमी त्यांच्यासोबत असेन. पण माझी खदखद मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन. पण मला न्याय देत असताना, लोकांना उत्तर देत असताना खंबीरपणे साथीची गरज असते. तिच मिळत नसेल तर कार करणे अवघड होते, असे पाटील म्हणाल्या.

Leave a Comment