पुणे | मनसे नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौर्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे.
मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे. तसंच, ‘आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि “श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.
https://www.facebook.com/947239435316421/posts/6841935329180106/
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढील दोन दिवस राज ठाकरे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मायलेकराचा मृत्यू : शिंगणापूर घाटात 400 फूट खोल दरीत कार कोसळली
महाराष्ट्र हादरला ! महिलेनं वडिलांच्या साथीने स्वत:च पुसलं कुंकू