हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील Rupee Co-operative Bank ला आजपासून टाळे ठोकण्यात येणार आहे. ज्यामुळे बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा देखील बंद होणार आहेत. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे गेल्या महिन्यातच या बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि भविष्यात कमाईची शक्यता नाही, RBI ने म्हटले आहे.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, RBI कडून 10 ऑगस्ट रोजी लायसन्स रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. याच्या सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग लायसन्स 6 आठवड्यांनंतर रद्द केला जाईल, असेही आरबीआयने सांगितले होते. यानंतर बँकेच्या सर्व शाखा बंद होतील. ज्यामुळे ग्राहकांना आपल्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. 22 सप्टेंबरपासून रिझर्व्ह बँकेचे हे आदेश लागू होणार असून यामुळे Rupee Co-operative Bank चे कामकाज ठप्प होणार आहे.
खातेदारांच्या पैशांचे काय होणार ???
Rupee Co-operative Bank लिमिटेडमध्ये पैसे जमा असलेल्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून इन्शुरन्स कव्हरचा लाभ दिला जाईल. हे लक्षात घ्या कि, DICGC ही रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे. ही सहकारी बँकेच्या ग्राहकांना आर्थिक सेवा पुरवते. यामुळे ज्या लोकांनी सहकारी बँकेत 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली आहे, त्यांचे पैसे गमावण्याचा धोका नाही, कारण त्यांना DICGC कडून पूर्ण क्लेम मिळेल.
Rupee Co-operative Bank ने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 99 टक्क्यांहून जास्त ठेवीदारांना त्यांच्या डिपॉझिट्सची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे. 18 मे 2022 पर्यंत, महामंडळाने एकूण इन्शुरन्सच्या रकमेपैकी 700.44 कोटी रुपये आधीच भरले आहेत.
5 लाखांवरील पैशांचे काय होणार ???
Rupee Co-operative Bank च्या खात्यामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या ग्राहकांना त्यांचे पूर्ण पैसे मिळणार नाहीत. कारण DICGC कडून फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची परतफेड केली जाते .
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.rupeebank.com/
हे पण वाचा :
Bank FD : आता ‘या’ बँकेकडून FD वर मिळणार 7.70 टक्के व्याज, व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर तपासा
Jio च्या ‘या’ रिचार्ज प्लॅनमध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 24GB डेटा
FD Rates : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकांकडून FD वर दिले जाते आहे जास्त व्याज
Penny Stock : फक्त 2 रुपये किंमत असलेल्या ‘या’ शेअर्सने डिव्हीडंड देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल