रुपयाने गाठला निचांक; मोदी सरकारच्या चिंतेत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि करोना बळींची संख्या वाढल्याने आज चलन बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाने ७६.९१ चा सार्वकालीन नीचांक गाठला.  रुपयातील अवमूल्यन झाल्याने केंद्र सरकारच्या चिंतेत भर पडणार आहे. याचसोबत आयात बिलासाठी जादा खर्च करावा लागणार आहे.भांडवली बाजारात परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंत परकी गुंतवणूकदारांनी बाजारातून १२ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. परिणामी रुपयाला मोठा फटका बसला आहे.

परकी गुंतवणूकदार पैसे काढून घेत असल्याने डॉलरला मागणी वाढली आहे. यामुळे परकी गंगाजळी देखील कमी होणार आहे. ३१ मार्च अखेर देशात ४७५.५६ अब्ज डॉलरची विदेशी गंगाजळी आहे. बँकांकडून मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री केली जात आहे. परिणामी दोन महिन्यात परकी गंगाजळी ३ टक्क्यांनी कमी झाली आहे.

त्याआधीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया ८ पैशांनी घसरला होता. तो ७६.९१ वर बंद झाला होता. आज रुपया ७६.५० ते ७७.२० च्या दरम्यान ट्रेड करेल, असा अंदाज संस्थांनी व्यक्त केला आहे. करोना रोखण्यासाठी लॉकडाऊन अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी ९ ते १० लाख कोटींची आर्थिक मदत आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्राकडून आर्थिक मदतीची मागणी जोर धरू लागली आहे.सलग तिसऱ्या सत्रात डॉलर वधारला आहे. अमेरिकेत बेरोजगारीची ताजी आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी डॉलरचे मूल्य आणखी वाढेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.

Leave a Comment