“रशिया-युक्रेन युध्दाचे जगावर दुष्परिणाम; पेट्रोल, डिझेलच्या दरात भर पडून महागाई वाढेल” – जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

रशिया-युक्रेन युद्धाने पेट्रोल, डिझेलच्या दरात भर पडून महागाई आणखी वाढेल. या युद्धाचे दुष्परिणाम हळूहळू जगावर पडतील. असे भाष्य राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी साखराळे येथील तिसऱ्या गाव बैठकीत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यात आज किमान 4 ते 5 हजार गाव बैठका होवून विविध प्रश्र्नांना गती मिळेल. विविध विषयांवर विचारमंथन होईल असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील कार्यकर्त्यांना ’एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी’ हा उपक्रम दिला असून या उपक्रमा अंतर्गत ते साखराळे येथे बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले,”राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला कोण विचारतो? आणि त्याने समर्थांना संपूर्ण राज्य गुरू दक्षिणा म्हणून दिले ही विधाने चुकीची आहेत.”

त्यांनी अलीकडे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या लग्नावरूनही असेच विधान केले आहे. युक्रेनमधील तुंग, डिग्रज आदी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी सांगितलं.