औरंगाबादेत बनवली जातेय रशियन लस : वोक्हार्टमध्ये लसीच्या चाचण्या अंतिम टप्यात

औरंगाबाद : शहरातील वोक्हार्ट कंपनीमध्ये आता स्पुतनिक लस तयार होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विदेशी कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सुरू आहे. त्याबाबत अतिशय दक्षता पाळली जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, रशियन कंपनीच्या ‘स्पुटनिक-व्ही’ या लसीचे उत्पादन वोक्हार्ट कंपनीत घेतले जाणार असून त्याबाबत विदेशी कंपनीसोबत करार होणार आहे. या चाचण्यांचे अहवाल सादर झाल्यानंतर लगेच वोक्हार्ट कंपनीत लसीच्या उत्पादनाची परवानगी मिळणार आहे. बुधवारी या संदर्भात कंपनीचे चेअरमन हबील खोराकीवाला यांनी या प्रकल्पाला भेट देऊन आढावाही घेतला आहे.

भारतामध्ये सध्या कोविशील्ड, व स्पुटनिक-व्ही, कोव्हॅक्सिनचाया कोरोना प्रतिबंधक लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याने केंद्र सरकारने या लसींचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. केंद्र सरकारने मुंबईतील ‘हाफकीन’ मध्ये स्वदेशी लस उत्पादनाला मंजुरी दिली, मात्र त्याचे सोपस्कार अजून पूर्ण झालेलं नाहीत. त्याच्या आधी वोक्हार्टमध्ये स्पुटनिकचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.

You might also like