Monday, February 6, 2023

उत्तम प्रशासक आणि कामातही “दादा”; रोहित पवारांकडून अजितदादांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस.. वाढदिवसानिमित्त अजित पवारांना राज्यभरातून शुभेच्छा येत असून आता अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आहे.

रोहित पवारांनी याबाबत एक ट्विट करत अजितदादांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिलेल्या शब्दाला जागणारे, उत्तम प्रशासक आणि कामातही ‘दादा’ असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. दादांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना! अस म्हणत रोहित पवारांनी अजितदादांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

अजितदादा म्हणजे बोले तैसा चाले- धनंजय मुंडे

दरम्यान, सामाजिक न्यायमूर्ती धनंजय मुंडे यांनी देखील अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘बोले तैसा चाले’ ही म्हण तंतोतंत लागू पडणारे, राज्याचे कृतिशील उपमुख्यमंत्री, आमचे नेते मा.ना.श्री. अजितदादा, आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे व आपले नेतृत्व कायम या महाराष्ट्राला लाभावे हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना! अस ट्विट धनंजय मुंडे यांनी केले.