सातारा | सध्या महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती जोरात सुरु आहेत. खास करून बैलगाडा शर्यतींना ग्रामीण भागात या शर्यतींना लोकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अनेक ग्रामीण भागात यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात येत आहेत. त्यातच आता साताऱ्यातील नरवणे (ता. माण) येथे सटवाईदेवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जावेद मुल्ला तांबवे यांच्या सर्जा व माणिक या बैलजोडीने पहिल्या क्रमाकांचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.
तांबवेकरांच्या प्रसिद्ध अशा सर्जाला पाहण्यासाठी मैदानावर गर्दी रुस्तम-ए-हिंदकेसरी व तांबवेकरांचा पब्लिकचा लाडका असलेल्या सर्जा बैलाने नरवणे मैदानात पहिल्या क्रमाकांचे 51 हजारांचे बक्षीस व ढाल मिळवले. यावेळी सर्जा बैलाला पाहण्यासाठी बैलगाडा मैदानावर प्रेक्षकांनी अक्षरश मोठ्या प्रमाणात तोबा गर्दी केली होती. हिंदकेसरी किताबाचा मानकरी सर्जा बैलाने पहिला राऊंड तसेच सेमीफायनल मैदान मोठ्या फरकाने मारले. त्यामुळे फायनलमध्येही सर्जा बैल बाजी मारणार अशी खात्री प्रेक्षकांना होतीच आणि निकाल सुद्धा तसाच लागला आणि सर्जाने शर्यतीत बाजी मारलीच.
या बैलगाडी शर्यतीतील बक्षिस विजेत्या बैलगाडी पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक –
जावेद मुल्ला (तांबवे) सर्जा आणि माणिक बैलजोडी (५१ हजार),
दुसरा क्रमांक :- • आरोही पकंज घाडगे (शिरसवाडी) रायफल आणि महाकाल बैलजोडी (३१ हजार),
तिसरा क्रमांक :- भोजलिंग प्रसन्न (वीरकरवाडी) मेहबुब आणि वर्या बैलजोडी (२१ हजार),
चतुर्थ क्रमांक :- दत्ता पाटील (झरे) भावड्या आणि सरदार बैलजोडी (११ हजार),
पाचवा क्रमांक :- ज्योतिर्लिंग प्रसन्न (नरवणे- कडेपूर) चिमण्या आणि सर्जा बैलजोडी (७ हजार),
सहावा क्रमांक :- वैभव आप्पासाहेब (माळशिरस) यांचा सुलतान आणि सागर बैलजोडी,
सातवा क्रमांक :- समर्थ डुबल (शिरवडे) सागर आणि बादल बैलजोडी