शेतकऱ्यांसाठी मदत हवेय ना? मग केंद्रासोबत कशाला कटुता वाढवता- अतुल भातखळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळणे आवश्यक आहे. मग अशावेळी राज्य सरकार केंद्रासोबत कटुता कशाला वाढवत आहे, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. (BJP leader Atul bhatkhalkar criticized Thackeray govt)

सीबीआयला राज्यात थेट तपासासाठी दिलेली सर्वसाधारण परवानगी काढून घेण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. टीआरपी प्रकरण अंगावर शेकेल,याची खात्री राज्य सरकारला असावी. त्यामुळेच राज्य सरकारने ही परवानगी काढून घेतली असावी. ठाकरे सरकार सीबीआयला एवढे का घाबरतेय? दाल में कुछ काला है? या पुरी दाल काली है?, अशी शंकाही भातखळकर यांनी उपस्थित केली.

दरम्यान, महाविकासआघाडी सरकारने महाराष्ट्रात तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (CBI) दिलेली सर्वसाधारण परवानगी काढून घेतली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील कटुता वाढण्याची शक्यता आहे.

सीबीआयची सर्वसाधारण परवानगी रद्द करणारं महाराष्ट्र चौथं राज्य
याआधी आंध्र प्रदेशसह पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड सरकारने देखील कलम 6 चा उपयोग करुन सीबीआयला राज्यात ‘नो एन्ट्री’ केली होती. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदी सरकारविरोधात आवाज उठवला होता. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशात सीबीआयच्या हस्तक्षेपावर बंदी घातली. त्यानंतर लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपल्या राज्यात सीबीआयच्या हस्तक्षेपावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सीबीआयला पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्याआधी ममता सरकारची परवानगी घ्यावी लागत आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment