जयपूर । सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे गेहलोत सरकारच्या स्थिरतेलाच धोका निर्माण झाला असताना काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन काँगेसकडून हटवण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी हा निर्णय जाहीर केला. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह राजस्थान प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवण्यात आले आहे. या बरोबरच काँग्रेसने आमदार गोविंदसिंह डोटासरा यांची राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या बरोबरच पायलट यांचे समर्थक विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.
Sachin Pilot removed as Deputy Chief Minister, announces Congress leader Randeep Singh Surjewala #Rajasthan pic.twitter.com/5tj3TJxZe8
— ANI (@ANI) July 14, 2020
आज जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची दुसरी बैठक झाली. या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर रणदीप सूरजेवाला यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय जाहीर केला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या १०२ आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केली. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”