‘रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा’ ; काँग्रेसचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा आहे. राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी भाजप, आरएसएसकडून लुबाडला जाऊ शकतो”, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर केला आहे. “राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टलाच आपला निधी पोहचेल याची जनतेने काळजी घ्यावी”, असंदेखील आवाहन त्यांनी केलं आहे.

भाजपा आणि संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले 1400 कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता”, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे.

“अखिल भारतीय हिंदू महासभेने 2015 साली विश्व हिंदू परिषदे तर्फे 1400 कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. यासंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाला 4 ऑगस्ट 2017 रोजी तक्रार केली होती”, असादेखील दावा सावंत यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment