हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असे महत्वाचे विधान केले. त्यांच्या या विधानावर काँग्रेकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “सावरकरांबद्दल राहुल गांधी जे बोलले त्यामध्ये कुठल्याप्रकारची ऐतिहासिक मोडतोड नाही ते सत्य आहे. त्यामुळे सत्य कटू असलं तरी ते सत्यच आहे, असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन सावंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,’सावरकरांबद्दल राहुल गांधी जे बोलले. त्याला आता करणार काय आपणे ते बदलू शकत नसतो. देश चालत असताना तो गांधींच्या विचाराने चालावा, तो सावरकरांच्या विचाराने चालूच शकत नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे. तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते. यामुळे एकत्र आलो नव्हतो तर देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो होतो. त्यामुळे शिवसेना ज्यावेळी कुठलाही विषय मांडते, त्यावेळी ते विषय लोकशाही आणि संविधानाच्या परिघातले नसले तर ते आम्हाला आवडतात असं नसतं.
राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/2CEENhjIot#Hellomaharashtra @RahulGandhi @INCIndia
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 18, 2022
संजय राऊत नेमकं काय म्हणाले ?
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा देताना महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात या यात्रेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर भारत जोडो यात्रा महागाई, बेरोजगारीपासून हुकूमशाहीच्या मुद्द्यावर सुरू असताना वीर सावरकर यांचा विषय काढण्याची गरज नव्हती. सावरकरांचा विषय काढल्याने फक्त शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्र काँग्रेसलाही धक्का बसला आहे. राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा त्यांनी दिला.
राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल नेमकं काय म्हंटल –
सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे असे एकामागून एक सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केले. एवढंच नव्हे तर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेली चिट्ठीही त्यांनी वाचून दाखवली.