मुंबई । सचिन तेंडुलकरने आपल्या घराबाहेर रक्तदान शिबिरात भाग घेतला आणि रक्तदानही केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची काही छायाचित्रे समोर आली असून त्यामध्ये तो रक्तदान वाहनातून बाहेर पडताना दिसत आहेत. सचिनने घराबाहेर रक्तदान शिबिरात भाग घेतला आणि रक्तदानही केल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर सचिन म्हणाला होता की,” पात्र ठरल्यावर तो प्लाझ्मा दान करेल.”
सचिन तेंडुलकर हा बर्याचदा सामाजिक प्रश्नांशी संबंधित असतो. कोरोना काळातही तो आपल्या पातळीवर सरकार आणि जनतेला सतत मदत करत असतो. देशातील कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मदतीसाठी पुढे आला आणि एक कोटी रुपयांची मदत दिली.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजनंतर सचिन तेंडुलकर स्वत: कोविड -19 चा बळी ठरला, परंतु कोरोनातून बरे झाल्यानंतर सचिनने कोविड -19 रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर खरेदी करण्याच्या उद्देशाने एक कोटी रुपयांची देणगी दिली आणि आता तो रक्तदान करून समाजाला मदत करत आहेत.
सचिनने काही काळापूर्वीच सांगितले होते की त्याने आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीचा एक मोठा भाग तणावाखाली व्यतीत केला होता आणि नंतर त्याला हे समजले होते की, सामन्यापूर्वीचा तणाव हा या खेळाच्या तयारीचा महत्त्वाचा भाग होता.
कोविड -19 दरम्यान बायो-बबलमध्ये जास्त वेळ घालविल्यामुळे खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल बोलताना मास्टर ब्लास्टर म्हणाला की,”त्यास सामोरे जाण्यासाठी त्याची स्वीकृती आवश्यक आहे. कालांतराने मला जाणवले की, खेळासाठी शारीरिक तयारी करण्याबरोबरच आपल्याला स्वतःला मानसिक तयारी देखील करावी लागेल.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group