हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोविड -१९ या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे. अनेकांनी पगार देण्याचे जाहीर केले आहे, तर अनेकांनी वैद्यकीय उपकरणे दिली आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गरिबांना ५० लाख रुपयांचे तांदूळ वाटप करण्याची घोषणा केली.
“सचिन तेंडुलकर यांनी पंतप्रधान मदत निधीला २५ लाख रुपये आणि मुख्यमंत्री मदत निधीला २५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती एका सूत्रांनी दिली. त्याला दोघांनाही हातभार लावायचा होता. “
युसुफ आणि इरफान पठाण यांनी बडोदा पोलिस आणि आरोग्य विभागाला ४०००फेस मास्क दिले आहेत, तर महेंद्रसिंग धोनी यांनी पुण्यातील धर्मादाय संस्थेमार्फत १ लाख रुपये दिले आहेत. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि फर्राटा धावपटू हिमा दास यांनीही आपला पगार देण्याचे जाहीर केले आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन