हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे मास्टरब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्याकडून नेहमी कोणत्या ना कोणत्या ठिकाणांना अचानकपणे भेट दिली जाते. त्यानंतर ते आपल्या भेटीचे व्हिडीओ शेअर करतात. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याऐवजी त्यांनी राजस्थानात चुलीवरच्या चुलीवर स्वयंपाकाची चव घेतली आहे. यावेळी स्वयंपाक बनविणाऱ्या महिलांशी त्यांनी संवादही साधला. त्यांचा हा व्हिडीओ त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअरही केला आहे.
महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 9 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र आजही त्यांच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. त्यांनी नुकतीच राजस्थान येथील चुलीवरच्या स्वयंपाकाची चव चाखली आहे. यावेळी सचिनने स्वयंपाक करत असलेल्या महिलांच्या ठिकाणी हजेरी लावली. यावेळी त्यांनी महिलांसोबत चुकीवरच्या स्वयंपाकाची माहितीही घेतली.
https://www.instagram.com/p/CmwG41TgxVy/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
यावेळी सचिनने महिलांसोबत चर्चा करत त्या पोळ्या कशापासून बनवतात? असा प्रश्न विचारला. त्यावर आपण गहू आणि बाजरीपासून बनवत असल्याचे महिलांनी सांगितले. चुलीवरील स्वयंपाकाची चव काही वेगळीचं असते. देशी तुपाचा सचिनने वास घेतला. तसेच त्यांनी त्याबाबत प्रतिक्रियाही दिली. एवढा तूप मी माझ्या जीवनात कधी खाल्ला नाही. पण, हा तूप आवडीनं खाणार, असे सचिनने म्हंटले आहे.