हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून संप सुरूच ठेवला आहे. त्यानंतर आता एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढत आहेत यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली.
या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना म्हणाले होते की, एखादे आंदोलन किंवा मोर्चा आला तर माझा मंत्री सहाव्या मजल्यावर बसणार नाही तो मोर्चाला समोरे जात प्रश्न सोडवेल. मात्र उद्धव ठाकरेंचा सहाव्या मजल्यावरील मंत्री खाली आलाच नाही. परंतु आंदोलकांना रस्त्यावर अडवले जातेय, पोलिसांचा दबाव टाकला जातोय.
ठाकरेंच्या सरकारमध्ये शिवशाही नाही तर मुघलशाही आणली आहे. याचा मी निषेध करतो. अनिल परबांना आवाहन आहे की, पोलिसांच्या माध्यमातून गरीबांचे आंदोलन चिरडू नका. तुमच्यात हिंमत असेल तर एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करा. तुम्ही आयुष्यभर पोलीस संरक्षणात नाही राहू शकत. त्यामुळे ही महाराष्ट्रातील जनता तुम्हाला मातीत गाठल्याशिवाय राहणार नाही.”
सदा भाऊ खोत म्हणाले की, “मैदानात चर्चेसाठी तयार असता तर चर्चेसाठी आम्ही तयार होतो. अनिल परब मंत्रालयात गंजा ओढत बसलेले आहेत. ज्या खात्याचे परब मंत्री आहेत त्या खात्यातील कर्मचाऱ्यांना तुम्ही पोलिसांच्या दबावाने रस्त्यावर बसवले आहे. लायकी नाही परिवहन मंत्री म्हणून राहण्याची. अनिल परबांना सांगतो, तुम्ही आंदोलन मोडाल पण महाराष्ट्रातील जनता मोडणारी नाही वाकणारी नाही. ही महाराष्ट्रातील जनता एसटी कर्मचाऱ्य़ांसाठी रस्त्यावर उतरेल असेही सदाभाऊ म्हणाले.