जेष्ठ संपादक सदा डुंबरे यांचे कोरोनामुळे निधन

Sada Dumbre
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | स्वतःच्या विचाराच्या विरोधात असलेले लेख सहसा संपादक नाकारतात पण सदा डुंबरे यांनी तसं कधीच केलं नाही. त्यांनी स्वतःची “एडिटोरीयल पॉलिसी” कधीच कुणावर लादली नाही. अगदी म्हणजे स्वतःच्या विचाराच्या विरोधी विचार असणाऱ्याला सुद्धा त्यांनीं प्रोत्साहन दिलं, असं व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाहीये हे यायचं दुःख आहे. हे विधान आहे मराठील्या एका नामवंत प्रकाशन संस्थेच्या संपादकाचं. “साप्ताहिक सकाळ” चे तब्बल २१ वर्ष संपादक राहिलेल्या पण कोरोनाने आज आपल्याकडून हिरावून घेतलेल्या संपादकाच्या बाबतीत. म्हणजेच जेष्ठ संपादक सदा डुंबरे यांच्या बाबतीत. गेल्या पंधरा दिवसांपासून सदा डुंबरे यांच्यावर उपचार सुरू होते.पण आज त्यांची तब्बेत जास्तच खालावली होती.साधारण दुपारी चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे. सदा डुंबरे हे मूळ पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावाचे.त्यांचे शिक्षण पुण्यातच झाले. पुण्यातूनचं पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यावर त्यांनी “सकाळ” या नामवंत वृत्तपत्र संस्थेतून पत्रकारितेची सुरवात केली.पुढे सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक पद देखील भूषवले.त्यानंतर ते “साप्ताहिक सकाळ”चे संपादक झाले. जलवपास २१ वर्ष ते या साप्ताहिकाचे संपादक होते.या मासिकाला लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.अनेक नवोदित लेखकांपासून ते नामवंत लेखकांचे दर्जेदार लेख त्यांनी त्या साप्ताहिकात छापून वाचकांची वैचारिक बैठक पक्की करण्याचे काम केले. सामाजिक आणि राजकीय विषयांवरचे त्यांचे लिखाण प्रचंड गाजले.

सकाळचे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकर, श्री.ग. मुणगेकर यांचा प्रचंड प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर होता. साप्ताहिक सकाळला लोकप्रिय करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. नानासाहेब परुळेकर आणि श्री. ग. मुणगेकर यांच्या पत्रकारितेचा त्यांच्यावर प्रभाव होता. तोच वारसा त्यांना पुढे चालवला. अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर त्यांनी लेखन केले. शब्दरंग, प्रतिबिंब यासंह विविध विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली.