हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. यानंतर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत सडकून टिका केली आहे. हसन मुश्रीफ निर्दोष सिद्ध झाले तर त्यांनी स्वत:ची मिरवणूक हत्तीवरून काढावी, असा टोला सदभाऊंनी लगावला.
सदाभाऊ खोत म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी केलेले आरोप हिमतीने स्वीकारले पाहिजेत. कर नाही त्याला डर कशाला म्हणून येणाऱ्या चौकशीला सामोरे गेले पाहिजे. प्रत्येकाची हत्तीवरून मिरवणूक काढतो म्हणणारे निर्दोष झाले, तर त्यांनी स्वत:ची मिरवणूक हत्तीवरून काढावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
आरोप झाल्यानंतर शांतपणे त्याचा सामना केला पाहिजे. दोषी नसेल तर भीतीचे कारण काय, ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी घाबरण्याची गरज नाही. मुश्रीफ मोठे नेते आहेत. त्यांचा आकडाही मोठा असतो. असा टोलाही त्यांनी लगावला.