सांगली । दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. राजू शेट्टी यांच आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंगप्रमाणे दूध फिक्सिंगचं आंदोलन असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सरकारने त्यांना चर्चेसाठी ज्या दिवशी बोलावलं आहे त्याच दिवशी ते आंदोलन करत आहेत, राजू शेट्टी येण्याची ही भूमिका दुटप्पी असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. याशिवाय आमदारकी मागायला तुम्ही बारामतीला गेले मात्र आता बैठकीसाठी न जाता आंदोलन करताय, राजू शेट्टींची ही भूमिका शंकास्पद असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बोलावलेल्या बैठकीला विधान परिषदेच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. आम्ही फॉरेनहून आलो आहोत काय? असा सवाल करत, जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही परदेशी वाटलो असल्यानेच त्यांनी बैठकीला बोलावलं नाही, आम्ही आमदार आहोत, आम्हालाही बैठकीला बोलावलं पाहिजे होतं, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे. दूध दरवाढी संदर्भात भाजपच्या आमदारांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनी निवेदन दिलं आहे. जर दूध दरवाढ केली नाही, तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशाराही, सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”