हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमची सत्ता राज्यात आल्यानंतर आम्ही मोफत वीज देऊ , आणि नाही दिली तर आम्ही पवारांची अवलाद सांगणार नाही अस आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते त्यामुळे आता तुम्ही कोणाची अवलाद आहे असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. ते नाशिक येथे जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या आंदोलनात बोलत होते.
सदाभाऊ म्हणाले, कोरोना काळ संपला असला तरी राज्य सरकारचा कोरोना मात्र संपत नाही आहे. राज्याच्या सरकारी तिजोरीवर महाविकास आघाडी सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. नाही दिले तर आम्ही पवार यांची अवलाद म्हणनार नाही असे बोलले होते. मग आता तुम्ही कुणाची अवलाद आहे हे त्यांनी सांगावे अस सदाभाऊ खोत यांनी म्हंटल.
यावेळी त्यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला. पीकविमा, नियमित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अजूनही मिळालेले नाहीत. आमची सत्ता आल्यावर प्रत्येक शेतकऱ्याचे 10 हजार कर्ज भरणार अस शिवसेनेनं म्हंटल होत, पण 10 हजार तर सोडाच , सरकारने शेतकऱ्यांची विजच कापली आहे अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.