शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा अस राऊत म्हंटले नाहीत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार जाहीर करावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तरी बर झालं, शरद पवार यांना अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली नाही अस म्हणत त्यांनी खिल्ली उडवली. ते सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा असं म्हटलं नाही, त्याबद्दल संजय राऊत यांचं अभिनंदन करतो. पवार साहेबांनी यापूर्वीच सांगितले की, मी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाही. गावगाड्यात म्हण आहे की, ज्याचं त्याला कळेना आणि शेजाऱ्याला रात्रभर झोप येईना. त्यामुळे संजय राऊत रात्रभर जागलेत. त्यामुळे ज्याचे त्याला कळेल की काय करायचे अस म्हणत संजय राऊत यांचे म्हणणे म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे आहे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.

दरम्यान, शिवसेना नेते अदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरूनही त्यांनी जोरदार निशाणा साधला. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला. तसेच राम मंदिर बांधायची यांच्यात हिंमत नाही असे विधान ज्यांनी केले तेच आता आयोध्येला निघालेत असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.