हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी 20 जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतल्यानंतर सदाभाऊ यांची पुढची वाटचाल काय असेल याकडे लक्ष लागले होते. आज त्यांनी ट्विट करत मी लढेन नव्या उमेदीने अस म्हंटल आहे.
सदाभाऊ खोत यांनी ट्विटर अकाउंट वर सुरेश भट यांची गझल शेअर केली आहे. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, ही गझल सदाभाऊ यांनी शेअर केली आहे. तसेच, लढेन नव्या उमेदीने… ..असे कॅप्शनही त्यांनी दिले आहे.
लढेन नव्या उमेदीने …… pic.twitter.com/iel4QLW11t
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) June 15, 2022
दरम्यान, येत्या 20 जूनला विधानपरिषद निवडणूक होणार आहे. सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना भाजपने पाठिंबा जाहीर केला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पहायला मिळेल.