कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी
अनेक छोटेमोठे तसेच वेगवेगळ्या उंचीवरुन कोसळणारे अनेक धबधबे दिसतात मात्र उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? …पावसाळा आला की डोंगर कपारीतुन अनेक छोटेमोठे तसेच वेगवेगळ्या उंचीवरुन कोसळणारे अनेक धबधबे दिसतात. मात्र उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? … हो हे खरच आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण केलेल्या सडावाघापुर पठारावर हा रिव्हर्स धबधब पहायला मिळतो. पाटण पासुन अवघ्या १२ किलो मिटरवर सडावाघापुर पठारावर हा धबधबा उलटया दिशेने वाहतो.
जोरदार पाऊसाचे पठारावरुन वाहुन जाणारे पाणी खोल दरीत कोसळताना दरीतून वर येणारे वारे पाण्याला वर ढकलते. दरीतील प्रचंड वाऱ्यामुळे उलट्या दिशेने पाण्याला जोरदार पणे वर ढकलते. त्यामुळे खाली जाणारे पाणी जोरदार फवारा मारते. जोरदार पाऊस व प्रचंड वारा यावेळी ही स्थिती होते. पाऊसाचे पाणी डोंगराखाली पोहचतच नाही. हा रिव्हर्स धबधबा अनुभवण्यासाठी राज्यभरातील पर्यटक गर्दी करीत आहेत.
मात्र प्रचंड आकारमानाने पठारावर दाट धुके आणि पाउसामुळे पर्यटकांना धबधबे शोधने अवघड होत आहे. योग्य दिशादर्शक फलक लावणे धबधब्याच्या बाजुने संरक्षक कठडे लावण्याची व पर्यटना वाढीच्या दुष्टीने याठिकाणचा विकस करणेची मागणी पर्यटकांनी केली आहे