शिव मंदिरात पुजा करायला नकार दिला म्हणुन साधूंना मारहाण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील साधूंच्या हत्येनंतर मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील शिव मंदिराच्या महंतावर प्राणघातक हल्ला झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथे लॉकडाउनमुळे शिव मंदिरात पूजा करण्यास नकार दिल्यानंतर पूजेसाठी आलेल्या लोकांनी मंदिराच्या महंतावर लाठी-काठीने हल्ला केला.यावेळी महंतने सुटून कसाबसा आपला जीव वाचविला.माध्यमांच्या वृत्तानुसार ही घटना सोमवारी २७ एप्रिल रोजी घडली. सध्या पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सतना जिल्ह्यातील गोराईया गावातील आहे. सोमवारी संध्याकाळी सुमारे अर्धा डझन लोकांनी येथील शिव मंदिराचे महंत दिनेश मिश्रा यांच्याशी भांडण सुरू केले.असे सांगितले जात आहे की या महंताने सकाळी कुलसिंह बरगाही आणि त्यांचे पुतणे यांना लॉकडाउन सुरु असल्यामुळे पूजा करण्यास नकार दिला. यामुळे छोटासिंह बरगाही व त्यांच्या पुतण्यांनी महंतवर काठीने हल्ला केला.या मारहाणी दरम्यान त्यांचा बचाव करण्यासाठी आलेले लोकही जखमी झाले.ज्यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्यावर खोल जखम झालेली आहे.

यावेळी शिवमंदिराच्या महंतने कसाबसा आपला जीव वाचविला आणि कोटर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास सुरू केला आहे. अप्पर एसपी गौतम सोलंकी म्हणाले की, शिवमंदिरात महंत आणि त्यांच्या नोकरांवर हल्ला करण्यात आला आहे. मंदिरात पाणी अर्पण करण्यावरून हा वाद झाला आणि यावेळी दोन्ही बाजूंनी मारहाण केली गेली.महंतच्या सेवकाने तक्रार दाखल केली असून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.