हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिले. सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्याना सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रातील दाव्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या प्रतिक्रियानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खळबळजनक ट्विट केलं आहे. “महाराष्ट्रात “भगव्या” च राज्य येते आहे..हीच ती वेळ”; असे राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे.
शनिवारी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहल्यानंतर राजकीय वर्तुळात या पत्रावरून अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यात आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट केल्याने भाजप व शिवसेना यांच्या मनोमिलनाचे व सत्तांतराचा संकेत दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप व शिवसेना नेत्यांच्या राजकीय भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे.
महाराष्ट्रात "भगव्या" च राज्य येते आहे..
हीच ती वेळ !!!
😊😊😊
— nitesh rane (@NiteshNRane) June 20, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दलही चर्चा होत आहे. अशात रविवारी सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहीत भाजपशी व मोदींशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. या पत्रानंतर नितेश राणेंनी ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे भाजप व शिवसेनेबद्दलच्या चांगल्या संबंधाबद्दलच्या चर्चा अधिकच रंगू लागल्या आहेत.
अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांकडून आपापल्या पक्षाच्या स्वबळावर पुढील निवडणूका लढू असे सांगितले जात आहे. अशात रविवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हुख्यमंत्री ठाकरे याना पत्र लिहून आपल्या मनातील इच्छा बोलून दाखविली आहे. तसेच भाजपशी जुळवून घेण्याबद्दल विनंतीही केली आहे.