Saif Ali Khan Attack: पोलीस तपासात धक्कादायक खुलासे; सैफला मारण्याचे कारण आले समोर

0
1
saif ali khan attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Saif Ali Khan Attack| सध्या मुंबईत अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घडलेल्या चाकू हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आज मध्यरात्री चोरट्याने घरात घुसून सैफवर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफच्या मानेवर, पाठीवर, आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सैफवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

घरातील कर्मचाऱ्यांवर संशय

या प्रकरणात सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांवर पोलीस संशय घेत आहेत. एका महिला कर्मचाऱ्यानेच आरोपीला घरात प्रवेश दिल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. या महिलेने हल्लेखोराला घरात शिरताना पाहिले आणि तिने कालवा केला. त्यामुळे हल्लेखोराने महिलेवर चाकूने वार केले. तिच्या आरडाओरडीनंतर सैफ मदतीसाठी धावून गेला आणि या झटापटीदरम्यान हल्लेखोराने सैफवर देखील वार केले. (Saif Ali Khan Attack)

हायप्रोफाईल तपास सुरू

या सर्व प्रकरणांचा मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रँचच्या सात पथक तपास करीत आहेत. महत्वाचे म्हणजे, पोलिसांनी घरातील चार कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपासणी करत आहे.

हल्लेखोराच्या कनेक्शनचा तपास

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, हल्लेखोर सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्याच्या ओळखीचा होता. कारण, त्याने घरात शिरून रात्रभर दबा धरून बसल्याचे निष्पन्न झाले आहे. हा हल्लेखोर मुख्य दरवाजाला वळसा घालून पहिल्या खोलीतून घरात घुसला होता. परंतु अजूनही त्याचा मुख्य हेतू काय होता हे समोर आलेले नाही.

दरम्यान, या सर्व प्रकरणांनंतर आता सैफ अली खानच्या घराबाहेर कायम तैना बसणाऱ्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण की, हल्ला झाला त्यावेळी देखील घराबाहेर गार्ड उभे होते. त्यामुळे हल्लेखोर घरात कसा घुसला, यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महत्वाचे म्हणजे, सध्या सैफ अली खान याची प्रकृती स्थिर आहे. परंतु पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयातच ठेवले जाणार आहे.