टीम हॅलो महाराष्ट्र | अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीत देशाच्या सद्यस्थितीवर प्रथमच भाष्य केले. तो म्हणाला की, देशातील परिस्थिती पाहता असे दिसते की आपण धर्मनिरपेक्षतेपासून दूर जात आहोत आणि त्यासाठी कोणी मला लढा देताना दिसत नाही. तो म्हणाला की, एक अभिनेता म्हणून मी कोणतीही भूमिका घेणे योग्य नाही, कारण यामुळे चित्रपटावर आणि व्यवसायावर परिणाम होतो. म्हणूनच चित्रपटसृष्टीतील लोक राजकीय प्रतिक्रिया देण्याचे टाळतात. आपला व्यवसाय आणि त्यांच्या कुटुंबाला धोका असू नये म्हणून त्यांना राजकीय प्रतिक्रिया देणे टाळावे लागते.
सैफ अली खान बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी: अनसंग वॉरियर’ हा चित्रपट जोरदार कमाई करतो आहे. या चित्रपटात त्याच्या व्यक्तिरेखेचे कौतुक केले जात आहे. त्याच्या भूमिकेची तुलना ‘पद्मावत’ च्या अलाउद्दीन खिलजीच्या व्यक्तिरेखेशी केली गेली. या चित्रपटात इतिहासाचा विकृतीकरण करण्यात आल असून त्याला त्याबद्दल खेद वाटतो असे अलीकडेच मुलाखतीत सैफने म्हटले आहे.
सैफ अली खानने पत्रकार अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चित्रपटात जे दाखवले जाते तो इतिहास नाही. तो म्हणाला की, ‘इतिहास म्हणजे काय, ते मला माहित आहे, पण जर एखाद्याने चित्रपटात जे दाखवले आहे ते इतिहास आहे असे म्हटले तर मला त्यावर विश्वास नाही.
हे पण वाचा –
मी बुमराहसारखी बॉलिंग करू शकतो; आम्हाला व्हिडीओ पुरावा हवा – ICC
राखी सावंत झाली भावनिक, म्हणाली, फेकलेले अन्न खात आम्ही वाढलो, पहा व्हिडीओ
अभिनेता फरहान अख्तर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार; ‘या’ मराठी मॉडेलसोबत होणार शुभमंगल
‘या’ मराठी अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केले ‘इतके’ हाॅट फोटो
टिक-टॉकचा युझरचा डांन्स पाहून ह्रितीकही झाला चकित; व्हिडिओ होत आहे व्हायरल