सख्खा भाऊ पक्का वैरी ! सख्ख्या भावाने सख्ख्या भावाचा केला खून

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड – सख्खा भाऊ पक्का वैरी हि म्हण सर्वत्र प्रसिद्ध आहे. याच म्हणीला सार्थ ठरविणारी एक घटना बीड जिल्यातील माजलगाव तालुक्यात घडली आहे. आईच्या मानेवर विळा मारणा-या मुलाची आत्महत्या नसुन खुनच असल्याचे निष्पन्न झाले असुन सख्या भावाने सख्या भावाचा खुन केल्याची घटना तालुक्यातील मालीपारगाव येथे घडली असुन वडील मच्छिंद्र अंबादास कदम यांच्या फिर्यादीवरून लहान मुलगा गणेश कदम याने मोठा मुलगा बाबासाहेब कदम याचा खुन केला असल्याची फिर्याद ग्रामीण पोलिसात दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील माली पारगाव येथे बुधवारी ता. 1 दुपारी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शेतातच घर असणा-या पारूबाई कदम यांच्या मानेवर मुलगा बापू उर्फ बालासाहेब मच्छिंद्र कदम याने विळा मारून जखमी केले होते. यावेळी दुसरा मुलगा गणेश मच्छिंद्र कदम हाही तेथेच होता. आई पारूबाईला मारून गंभिर जखमी केल्यामुळे गणेशला राग अनावर झाला व त्याने बाबसाहेब कदम या सख्या भावाच्या मानेला जीव जाईपर्यंत त्याचा खुन केला. यानंतर आई पारूबाईल जखमी अवस्थेत बीडला उपचारासाठी हलविण्यात आले.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन सखोल चौकशी केली असता बाबसाहेब कदम यांची आत्महत्या नसुन खुन झाल्याचा प्रकार उघड केला. याप्रकरणी वडील मच्छिंद्र अंबादास कदम यांच्या फिर्यादीवरून गणेश कदम विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश इधाते करत आहेत. सख्या भावाने सख्या भावाचा खुन केल्याने माली पारगाव परिसरात खळबळ उडाली आहे.