महामुंबईत 8 लाख घरांची विक्री ठप्प; ‘ही’ प्रमुख कारणे आली समोर

Mumbai Home
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे मुंबईत म्हाडाची घरे खरेदी करण्यासाठी लाखो लोकांची गर्दी रांग लागली असताना दुसरीकडे याच भागात तब्बल 8 लाख घरे विक्रीविना पडून राहिली आहेत. आजही महामुंबई परिसरात ८ लाख घरांची विक्री झालेली नाही. ही माहिती क्रेडाई या संस्थेने एका अहवालातून प्रसिद्ध केली आहे. विद्यमान आर्थिक वर्षात मुंबईतील फक्त ३३ हजार ७१४ घरांचीच विक्री झाली आहे. वाढत्या व्याजदरामुळे तसेच घरांची वाढती किंमत अशा अनेक कारणांमुळे आजवर या घरांची विक्री झालेली नाही. तसेच या घरांना नागरिकांकडून देखील मागणी होताना दिसत नाहीये.

क्रेडाईने (CREDAI)आपल्या अहवालात म्हटले आहे की, सध्या महा मुंबई परिसरात 8 लाख घरे विक्री विना पडून असल्यामुळे उद्योजकांवर नवे बांधकाम प्रकल्पही पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. मुख्य म्हणजे, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी नव्या प्रकल्पांमध्ये एकूण 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे. या गोष्टीसाठी 2 मुख्य कारणे जबाबदार आहेत. त्यातले पहिले कारण म्हणजे वाढत चाललेला व्याजदर. आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे घरांच्या वाढत चाललेल्या किमती.

2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये तब्बल अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. या कारणाने सर्वच कर्जे महागली आहेत. देशात सर्वात जास्त कर्ज हे फक्त घर खरेदी करण्यासाठी घेण्यात येते हे स्पष्ट झाले आहे. मात्र आता कर्जाच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे इच्छुकांना घर घेण्यासाठी कर्ज काढणे परवडत नाही. त्यामुळे त्यांना घर घेण्याचे स्वप्न पुढे ढकलावी लागत आहेत. रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा फटका घर खरेदीदारांना सर्वात जास्त बसला आहे. आज याच कारणामुळे मुंबईत अनेक घरे विक्रीविना पडून आहेत.

त्याचबरोबर, सध्या ती स्थितीत महागाई वाढल्यामुळे कच्च्या मालाच्या किमती देखील वाढल्या आहेत. वाळू, सिमेंट, वीट, अशा सर्वच गोष्टींमध्ये महागाई झाली आहे. त्यामुळे उद्योजकांनी आपल्या गृह प्रकल्पाच्या किमती वाढवल्या आहेत. मात्र या किमती सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या नाहीत. क्रेडाईच्या अहवालानुसार, मुंबईत घरांच्या सरासरी किमती या प्रतिचौरस फूट १७ हजार २४७ रुपये इतक्या झाल्या आहेत. हीच किंमत गेल्या वर्षी प्रति चौरस १५ हजार रुपये इतकी होती.

घरे महागण्याची कारणे?

कच्च्या मालाच्या आणि जमिनीच्या वाढणाऱ्या किमती वाढल्यामुळे व्यावसायिकांना देखील स्वस्तात घर देणे परवडत नाही. वाढलेल्या महागाईमुळे बांधकामांच्या किमती देखील वाढल्याने सर्वच घरे महागली आहेत. यामध्ये नागरिकांना घरासाठी कर्ज काढणे देखील मुश्किल झाल्यामुळे ८ लाख घरांची विक्री थांबली आहे. भविष्यात जर महागाईत आणि कच्च्या मालांच्या किमती कमी झाल्या तर घरांचे दर कमी होऊ शकतात. मात्र तोपर्यंत घर घेऊ इच्छिणाऱ्यांना वाट पहावी लागणार आहे.